Bhiwandi: भिवंडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील दोघा तरुणांचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: March 1, 2023 19:34 IST2023-03-01T19:33:39+5:302023-03-01T19:34:28+5:30

Accident: भिवंडीहून मुंबई येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव ब्रिज जवळ घडली आहे

Two youths on a two-wheeler died in a collision with an unknown vehicle in Bhiwandi | Bhiwandi: भिवंडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील दोघा तरुणांचा मृत्यू

Bhiwandi: भिवंडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील दोघा तरुणांचा मृत्यू

- नितीन पंडित
भिवंडी - भिवंडीहून मुंबई येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव ब्रिज जवळ घडली आहे याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज सुनील कुंचिकोरवे वय २६ वर्ष व मुत्तु लक्ष्मण मुरघन तेवर वय २६ वर्ष दोघे रा.धारावी मुंबई असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत हे दोघे तरुण मंगळवारी रात्री भिवंडीतून मुंबईला जात असताना मुंबई नाशिक महामार्गावरील बॉम्बे धाब्याच्या पुढे खारेगाव ब्रिज जवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली या अपघातात दुचाकी वरील सुरज व मुत्तु यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे .

Web Title: Two youths on a two-wheeler died in a collision with an unknown vehicle in Bhiwandi