भिवंडीत क्रेनवरील लोखंडी बॉयलर अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू
By नितीन पंडित | Updated: July 10, 2024 19:57 IST2024-07-10T19:56:51+5:302024-07-10T19:57:08+5:30
Bhiwandi News: डाइंग कंपनीतील लोखंडी बॉयलर क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने बॉयलर अंगावर पडून दोघा कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सरवली एमआयडीसी येथे घडली आहे.

भिवंडीत क्रेनवरील लोखंडी बॉयलर अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू
- नितीन पंडित
भिवंडी - डाइंग कंपनीतील लोखंडी बॉयलर क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने बॉयलर अंगावर पडून दोघा कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सरवली एमआयडीसी येथे घडली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बाळाराम चौधरी वय ५५ वर्ष व पांडुरंग अबा पाटील ६५ असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा कामगारांची नावे आहेत.
सरवली एमआयडीसी येथे रौनक डाईंग लिमिटेड कंपनीत लोखंडी वॉटर प्री हिटर बॉयलर नवीन बसवण्याचे काम सुरू होते.हा लोखंडी अवजड बॉयलर क्रेनच्या मदतीने उचलून घेऊन जात असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटला व बॉयलर मजुरांच्या अंगावर पडला त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.