घरातच सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 00:17 IST2018-12-05T00:17:17+5:302018-12-05T00:17:25+5:30

दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली

Two women, who run a sex racket in the house, were arrested | घरातच सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना अटक

घरातच सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना अटक

ठाणे : किसननगर क्रमांक तीन येथील मातोश्री अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील एका खोलीत कुंटणखाना चालविणा-या सुमित्रा शेट्टी (३५) आणि इंदू खरे (४०) या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्या तावडीतून तीन पीडित महिलांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
किसननगरमधील एका निवासी इमारतीमध्ये कुंटणखाना सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी ४ डिसेंबर रोजी बनावट गिºहाईक पाठवून खातरजमा केली. ही खात्री पटताच सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दौंडकर यांच्यासह श्रीनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा गावडे यांच्या संयुक्त कारवाईत सुमित्रा आणि इंदू या दोघींना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. कायदेशीर प्रक्रीया सुरु असल्याची माहिती दौंडकर यांनी दिली.

Web Title: Two women, who run a sex racket in the house, were arrested