नवघरमध्ये वाहनाच्या धडकेत दोन महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 22:08 IST2019-11-14T19:48:34+5:302019-11-14T22:08:29+5:30
आरपीआय युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघेला सकाळी साडे सातच्या सुमारास आपल्या गाडीतुन जात असताना तेथे असलेल्या एका रिक्षाला जबर धडक दिली.

नवघरमध्ये वाहनाच्या धडकेत दोन महिला जखमी
मीरारोड - भाईंदर पुर्वेच्या नवघर नाका येथे आरपीआय (आठवले गट )च्या युवा जिल्हा अध्यक्षाने दोघा महिलांसह रिक्षाला धडक दिल्याची घटना गुुरुवारी सकाळी घडली आहे. यात दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत.
आरपीआय युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघेला सकाळी साडे सातच्या सुमारास आपल्या गाडीतुन जात असताना तेथे असलेल्या एका रिक्षाला जबर धडक दिली. त्याच बरोबर सकाळी फेरफटका मारण्यासाठी चाललेल्या सुमन पवार व कमलादेवी पंजाबी रा. नवरत्न पूजा, गावदेवी रोड , नवघर या दोघी महिला देखील या अपघातात जखमी झाल्या. जखमी महिलांना नजिकच्या साई गंगा या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवार यांच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे.
नवघर पोलीस ठाण्यात मात्र या प्रकरणी माहिती असुन देखील गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगण्यात आले. वाघेला याने काही महिन्यां पुर्वी बेस्ट बस चालक तसेच तरुणीस मारहाण केली म्हणुन नवघर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.