शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

धावत्या लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूमुळे दोघी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 6:48 AM

ठाणे रेल्वेस्थानकाचा फलाट सुटल्यानंतर डोंबिवली लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूचे तुकडे लागून डोंबिवलीतील दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ठाण्यात घडली.

ठाणे  - ठाणे रेल्वेस्थानकाचा फलाट सुटल्यानंतर डोंबिवली लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूचे तुकडे लागून डोंबिवलीतील दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ठाण्यात घडली. या घटनेनंतर त्या दोघींनी तक्रार देण्यास नकार दिल्याने अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी नोंद करून वस्तू फेकणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.शुक्रवारी रात्री सीएसएमटी ते डोंबिवली ही लोकल ठाण्यातून सुटली. त्याचदरम्यान तिच्या महिला डब्यावर अनोळखी व्यक्तीने फेकलेली टणक वस्तू त्या डब्यातील खांबावर जाऊन आदळून तिचे तुकडे होऊन ते त्या डब्यात उडाले. त्यातील काही तुकडे डोंबिवलीतील आशा पाटील (३२), सुष्मिता गावकर (२४) या दोघींना लागले. यामध्ये आशा यांच्या डोक्याला, तर सुष्मिता यांच्या हाताला जखम झाली. त्या दोघींना कळवा रेल्वेस्थानकात उतरवून लोहमार्ग पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्या झालेल्या प्रकाराबाबत दोघींनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतु, त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी त्याची नोंद करून त्याचा तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन असे प्रकार घडू नये, यासाठी लोहमार्ग पोलिसांनी तातडीने पेट्रोलिंगसाठी पथक तैनात केले आहे. तसेच अशा प्रकारे ठाण्यातील ही पहिलीच घटना असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सांगितले.उपचारास नकारजखमींना लोहमार्ग पोलिसांनी ठामपा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. त्यावेळी तेथे असलेल्या डॉक्टरांनी दोघींना जे.जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला देऊन उपचार करण्यास नकार दिला. लोहमार्ग पोलिसांनी उपचार केले नाही, तर आरोग्यमंत्र्यांना फोन लावतो, असे सांगितल्यावर त्या डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलthaneठाणे