भिवंडीत उड्डाणपुलावर ट्रक उलटल्याने ट्रकमधील दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:23 IST2019-03-04T22:07:02+5:302019-03-04T22:23:55+5:30
भिवंडी : शहरातील वंजारपाटीनाका बागेफिरदोस ते कणेरी रामेश्वरमंदिर या मुख्य रस्त्यावर असलेल्या स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ...

भिवंडीत उड्डाणपुलावर ट्रक उलटल्याने ट्रकमधील दोनजण जखमी
भिवंडी: शहरातील वंजारपाटीनाका बागेफिरदोस ते कणेरी रामेश्वरमंदिर या मुख्य रस्त्यावर असलेल्या स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता एस.टी.स्टॅण्ड समोरील बाजूस ट्रक पलटी झाला आहे.
स्व.राजीवगांधी उड्डाणपुलावर असलेले खड्डे वाचविण्यासाटी ट्रक चालकाने कट मारल्याने त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उड्डाणपुलावरील सुरक्षा कठड्यावर पलटी झाला. या अपघातात चालक व क्लिनर दोघे जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाल्याने पुलावरील वहातूक पोलीसांनी बंद केली.
शहरातील एस.टी.स्थानक समोरच ही घडली घटना असुन ट्रकमध्ये वाजवीपेक्षा जास्त(ओव्हरलोड)धाग्याचे कोम भरलेले होते. शहरातील अनेक ट्रान्सपोर्टच्या ओव्हरलोड गाड्या पोलीसांचा ससेमीरा वाचविण्यासाठी सर्रासपणे या उड्डाणपुलाचा वापर करतात. ट्रकमध्ये जास्त सामान भरल्याने खड्डा वाचविताना ट्रक चालकाने कट मारली असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीलगत उलटला. सुदैवाने हा ट्रक पुलावरून खाली न येत तो कठड्यावर अडकला अन्यथा पुलाखालून होणाऱ्या वहातूकीवर व पादचाऱ्यांच्या अंगावर कोसळला असता तर मोठी प्राणहानी झाली असती. ही घटना झाल्यानंतर याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचली नव्हती. दरम्यान निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले.