पाकिस्तानातूनच येणार दोन हजार टन कांदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:55 IST2019-09-26T00:15:33+5:302019-09-26T06:55:52+5:30
एकीकडे पाकिस्तानवर टीका, दुसरीकडे पाकिस्तानी कायद्याची आयात

पाकिस्तानातूनच येणार दोन हजार टन कांदा
ठाणे : एकीकडे पाकिस्तानवर टीका करून महाराष्ट्राची निवडणूक लढवणाऱ्या भाजप सरकारने कांद्याची पाकिस्तानातून आयात केली आहे. यासंदर्भातील पुरावाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ट्विट करून दिला आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे भाजप सरकार तोंडघशी पडले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारने पाकिस्तानला केंद्रीभूत ठेवून प्रचार सुरू केला आहे. ३७० कलम, बालाकोट असे मुद्दे भाजपच्या प्रचारामध्ये दिसत असले, तरी भारताने चक्क पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचे धोरण आखले आहे.