दोन चोरीच्या घटनांमध्ये अडीच लाखांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:07 IST2017-10-20T04:07:31+5:302017-10-20T04:07:42+5:30

जबरी चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. यामध्ये एका महिलेच्या पर्समधून तब्बल एक लाखांची रोकड चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 Two stolen cases stolen two and a half lakhs of money | दोन चोरीच्या घटनांमध्ये अडीच लाखांचा ऐवज चोरीला

दोन चोरीच्या घटनांमध्ये अडीच लाखांचा ऐवज चोरीला

ठाणे : जबरी चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. यामध्ये एका महिलेच्या पर्समधून तब्बल एक लाखांची रोकड चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वसईतील बांधकाम व्यावसायिक हितेश शहा हे बुधवारी ठाण्यात आले होते. दुपारी भिवंडीकडे जाणाºया रोडवरील एका हॉटेलसमोर त्यांनी जेवणासाठी गाडी उभी केली असताना, तिची काच फोडून चोरट्यांनी गाडीतील १ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. शहा यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर दुसºया घटनेत, राबोडीतील कैसर सय्यद (३४), या बुधवारी राबोडीतील कब्रस्तानजवळ आल्या होत्या. तेव्हा एका महिलेने त्यांच्या पर्समधून १ लाखांची रोकड पळवली. राबोडी पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदवण्यात आली.

Web Title:  Two stolen cases stolen two and a half lakhs of money

टॅग्स :Crimeगुन्हा