नशेची मागणी करणाऱ्या अल्पवयीन मुलावर दोघांनी केले चाकूचे वार

By जितेंद्र कालेकर | Updated: April 11, 2024 21:44 IST2024-04-11T21:43:56+5:302024-04-11T21:44:07+5:30

उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.

Two stabbed a minor who demanded drugs | नशेची मागणी करणाऱ्या अल्पवयीन मुलावर दोघांनी केले चाकूचे वार

नशेची मागणी करणाऱ्या अल्पवयीन मुलावर दोघांनी केले चाकूचे वार

ठाणे: एका १७ वर्षीय मुलाशी नशा करण्यावरुन झालेल्या वादातून त्याच्यावर साहिल उर्फ बाबू मोहम्मद हनीफ कुरेशी (२०) आणि फरहान शेख (२०) या दोघांनी वाद घातला. त्यापैकी साहिल याने चाकूने त्याच्यावर वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी गुरुवारी दिली.

कळव्यातील शांतीनगर भागात बाबू उर्फ साहिल कुरेशी आणि फरहान शेख हे ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास नशा करीत बसले होते. त्याचठिकाणी आलेल्या १७ वर्षीय मुलानेही त्यांच्याकडे नशेसाठी मागणी केली. यातूनच त्यांच्यात वाद झाल्याने साहिल आणि फरहान यांनी त्याला मारहाण केली. नंतर साहिल याने त्याच्याकडील चाकूने त्याच्या पोटावर वार करुन गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Two stabbed a minor who demanded drugs