भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 22:06 IST2025-09-03T22:05:11+5:302025-09-03T22:06:09+5:30
- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी दोन भरधाव कार मध्ये ...

भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी दोन भरधाव कार मध्ये झालेल्या ठोकरीत कार जागेवर वळल्याने कारच्या मागील दुचाकीस्वार थेट कारला ठोकर लागल्याने दुचाकी वरून उडून खाली रस्त्यावर पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल दादाराम तरे वय ३२ रा.अंजूर असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून कार चालक
अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी रा.मिल्लत नगर हा गंभीर जखमी झाला आहे.
भिवंडी कडून कल्याणच्या दिशेने होंडा सिटी कार चालक अब्दुल्ला मोहम्मद इलियास अन्सारी हा भरधाव वेगाने चालला असता भादवड येथील अरिहंत सिटी समोर आला असता त्यावेळी समोरून येणाऱ्या महिंद्रा एक्स यू व्ही कार यांच्यात जोरदार धडक झाली .ज्यामुळे दोन्ही कारच्या समोरील बाजूचे अतोनात नुकसान होऊन कार चालक अब्दुल्ला गंभीर जखमी झाला.तर महिंद्रा एक्स यू व्ही कार मधील एअर बॅग उघडल्याने ते बचावला असून त्यास किरकोळ मार लागला आहे.या अपघातात होंडा सिटी कार जागेवरच वळल्याने याच वेळी होंडा सिटी कार मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीची धडक कारला बसल्याने दुचाकीस्वार राहुल तरे हा थेट उड्डाणपुलावरून ५० फूट खालील रस्त्यावर फेकला गेला.ज्यामध्ये राहुलचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर कार चालक जखमी झाला आहे.
या उड्डाणपुलावर या आधी सुद्धा अपघात झाल्याने उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर पडून झालेल्या अपघातात तीन जणांचा बळी गेला आहे. पुलावरील अरुंद रस्ता व दुभाजक नसल्याने या मार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहेत.या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपघाती घटनेची नोंद घेतली जात आहे.राहुलच्या दुर्दैवी मृत्यू नंतर अंजूर गावात शोककळा पसरली आहे.