शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात घरफोडया करणाऱ्या दोघा अट्टल चोरटयांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 21:43 IST

दुपारच्या वेळी एखाद्या बंद घराची टेहळणी केल्यानंतर चोरी करायची. तत्पूर्वी आजूबाजूच्या घरांना कडी लावायची. अशा प्रकारे चो-या करणा-या शादाब सिद्धीकी आणि संतोष नाईक या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ चोरीच्या गुन्हयांची उकल झाली आहे.

ठळक मुद्देसाडे आठ लाखांचा ऐवज हस्तगतकळवा पोलिसांची कामगिरी१२ गुन्हयांची उकल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा परिसरात घरफोडया करणा-या शादाब कमर सिद्धीकी उर्फ बडा रेड्डी (२५, रा. शिळफाटा, ठाणे ) आणि संतोष नाईक (२९, रा.आतकोनेश्वरनगर, ठाणे ) या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा आठ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.कळवा परिसरातील वाढत्या घरफोडीच्या गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे तसेच चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलिकडेच गुन्हे आढावा बैठकीमध्ये दिले होते. याच पार्श्वभूमीवर घरफोडीच्या गुन्हयांच्या तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण आणि खब-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, तुकाराम पवळे आणि अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे उपनिरीक्षक एस. एच. पाटील, इरशाद सय्यद आदींच्या पथकाने शादाब आणि संतोष या दोघांना ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्यांनी कळव्यातील एका घरातून सोने आणि चांदीचे दागिने चोरले होते. कळवा आणि मुंब्रा परिसरातील असे १२ गुन्हे त्यांच्याकडून उघड झाले आहेत. त्यांच्याकडून २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच रोकड असा आठ लाख ४८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांना एक महिन्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. चौकशीमध्ये त्यांना वेगवेगळया गुन्हयांमध्ये न्यायालयाच्या परवानगीनंतर पुन्हा अटक केल्यानंतर हे सर्व गुन्हे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रेकॉर्डवरील गुन्हेगारशादाब आणि संतोष हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दुपारच्या वेळी बंद घरात चोरी करण्यासाठी ते शिरकाव करायचे. चोरी करण्यापूर्वी ज्या घरात चोरी करायची आहे, त्या घराच्या आजूबाजूच्या घरांना कड्या लावल्या जायच्या. त्यामुळे कोणाला या चोरीची चाहूल लागली, तरी मदतीसाठी कोणीही बाहेर येऊ नये, म्हणून ते घराच्या कड्या लावण्याची शक्कल लढवत होते. एका खब-याच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर या सर्वच चो-या उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी