शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेन जूनच्या पहिल्या आठवड्यात खुल्या होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडी पुलाच्या सहापैकी दोन लेन येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. ...

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडी पुलाच्या सहापैकी दोन लेन येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे. या दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात असताना कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी पाहणी केल्यानंतर ही माहिती देण्यात आली. यावेळी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, नगररचनाकार रघुवीर शेळके आदी उपस्थित होते.

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडी पूल हा दोन लेनचा होता. युती सरकारच्या काळात त्याचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेला पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. याच पुलाला समांतर सहा पदरी दुर्गाडी खाडी पुलाला २०१६ मध्ये मंजुरी दिली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. पुलाच्या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्याने त्याला दिलेले कंत्राट दोन वर्षांनंतर रद्द केले. नंतर १०१ कोटी रुपये खर्चाचे सहा पदरी पुलाचे काम तांदळकर आणि थोरात कंपनीला दिले. या कंपनीने रायगड येथील सावित्री पूल तयार केला होता. त्या कंपनीने पुलाचे काम युद्धपातळीवर उचलले. मात्र, २०१९ मध्ये अतिवृष्टीचा बसलेला फटका आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे पुलाच्या कामाची गती मंदावली होती. सहापैकी दोन लेन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुल्या झाल्यावर जुना अस्तित्वात असलेला दोन लेनचा पूल आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन लेन खुल्या झाल्यावर वाहतुकीसाठी चार लेन उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित चार लेनही भविष्यात खुल्या केल्या जातील. भिवंडी-कल्याण-शीळ रोडवरील दुर्गाडी खाडी पूल हा महत्त्वाचा पूल आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणचा पत्री पूल मार्गी लागला. त्यापाठोपाठ दुर्गाडीच्या दोन लेन खुल्या होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

रिंग रोडच्या कामासाठी मागितले पोलीस संरक्षण

दुर्गाडी खाडी पुलाच्या कामाची पाहणी केल्यावर महापालिका आयुक्तांनी कल्याण रिंग रोडच्या दुर्गाडी ते मांडा टिटवाळादरम्यानची पाहणी केली. रिंग रोडचे या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही ठिकाणी अडथळे आहेत. रिंग रोडचे काम ज्या ठिकाणी पूर्णत्वास आले आहे त्याचा वापर सुरू झाला आहे. झालेले काम जून महिन्यापर्यंत महापालिकेस हस्तांतरित केले जाईल. ज्याठिकाणी कामाला विरोध आहे. त्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी एमएमआरडीएच्या वतीने रेलकॉन कंत्राटदार कंपनीने पोलीस व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

----------------------