ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली
By अजित मांडके | Updated: April 20, 2024 17:12 IST2024-04-20T17:11:03+5:302024-04-20T17:12:50+5:30
नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तिनहात नाका येथे धर्मवीर नाक्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे.

ट्रक अपघातात दोघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली
अजित मांडके,ठाणे : नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने तिनहात नाका येथे धर्मवीर नाक्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रकने पुढे असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिली. तसेच पुढील झाडावर जाऊन ट्रक आधळला असल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कारमधील कोणालाही दुखापत झाली नसली तरी देखील ट्रकवरील चालक आणि क्लिनरला दुखापत झाली असून त्यांनी उपचारार्थ मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात रामप्रसाद शहाणी (३२)चालक रा. भांडुप आणि मोहन शहाणी (४०) क्लिनर रा. भांडूप हे दोघे जखमी झाले आहेत. चालक रामप्रसाद याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून क्लिनरच्या पायाला व चेहऱ्याला दुखापत झाली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. शनिवारी दुपारी २.३५ वाजताच्या सुमारास नाशिक वाहीनीवरुन मुंबई मुलुंडकडे रामप्रसाद ट्रक घेऊन जात असतांना तिनहात नाका परिसरातील धर्मवीर नाक्यावर त्यांचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक पुढे असलेल्या कारला घासून पुढे असलेल्या झाडावर जाऊन आधळला. यात कारमधील दोघांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. परंतु ट्रक चालक व क्लिनर जखमी झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर हा ट्रक वाहतुक पोलिसांनी बाजूला करण्याचे काम केले.