उल्हासनगरात घरफोडीच्या दोन घटना, लाखोंचा मुद्देमाल लंपास
By सदानंद नाईक | Updated: July 28, 2023 17:47 IST2023-07-28T17:46:46+5:302023-07-28T17:47:41+5:30
यप्रकारणी मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात घरफोडीच्या दोन घटना, लाखोंचा मुद्देमाल लंपास
उल्हासनगर : शहरात गुरवारी रात्री घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. यप्रकारणी मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, सी ब्लॉक परिसरात राहणाऱ्या पूनम मनोज गुप्ता यांच्या बंद घरात गुरवारी दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान प्रवेश केला. कपाटातील लॉकर मधून १ लाख ७ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत सुभाष टेकडी भारतनगर मध्ये राहणाऱ्या शिवगंगा तेलगोटे ह्या रात्री झोपल्या असताना चोरट्यांनी अर्धवट उघडा राहिलेल्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने असे एकून ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही घरफोडी प्रकरणी मध्यवर्ती व विट्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.