फ्रेंडशिप डेच्या बहाण्यानं अल्पवयीनवर दोन मित्रांनी केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 11:18 IST2018-08-07T11:17:56+5:302018-08-07T11:18:08+5:30
फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रीला काळिमा फासणारी घटना शहरात घडली आहे.

फ्रेंडशिप डेच्या बहाण्यानं अल्पवयीनवर दोन मित्रांनी केला बलात्कार
डोंबिवली - फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रीला काळिमा फासणारी घटना शहरात घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा करत तिला एका घरात नेऊन प्रतीक शेलार (वय 22 वर्ष) आणि अन्य एकानं तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन दोघांनाही अटक केली आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीच्या घराखाली रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास प्रतीक आणि अन्य एक जण आला. फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी आपण फिरायला जाऊ, असे या दोघांनी तिला सांगितलं. मुलगी त्यांच्यासोबत दुचाकीवरुन खंबाळपाड्याच्या दिशेनं गेली. या परिसरातील एका घरात प्रतीक आणि त्याचा साथीदार तिला घेऊन गेले. तेथे मारण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीनं रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.