रिक्षातील विवाहितेचा मोबाईल हिसकावून दोघांचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:57 PM2021-06-15T18:57:35+5:302021-06-15T18:59:50+5:30

कळवा येथे रिक्षातून जाणाऱ्या एका ४० वर्षीय गृहिणीचा मोबाईल दोघांनी हिसकावून पलायन केल्याची घटना खारेगाव येथे नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे.

The two escaped by snatching the mobile phone of the married woman in the rickshaw | रिक्षातील विवाहितेचा मोबाईल हिसकावून दोघांचे पलायन

खारेगाव येथील घटना

Next
ठळक मुद्दे खारेगाव येथील घटना कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तीन हात नाका येथे रिक्षातील तरुणीचा मोबाईल हिसकावतांना मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच कळवा येथेही रिक्षातून जाणाऱ्या एका ४० वर्षीय गृहिणीचा मोबाईल दोघांनी हिसकावून पलायन केल्याची घटना खारेगाव येथे नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे.
खारेगाव येथे मुंबई नाशिक मार्गावरुन ही विवाहिता ९ जून २०२१ रोजी रिक्षाने जात होती. त्याचवेळी एका मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या भामटयाने चालत्या रिक्षामध्ये हात टाकून या महिलेच्या हातातील ९० हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात १४ जून रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The two escaped by snatching the mobile phone of the married woman in the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.