मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी खेचून दोघांचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 00:42 IST2021-06-10T00:41:35+5:302021-06-10T00:42:35+5:30

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका ६० वर्षीय वृद्धेची पाऊण लाखाची सोनसाखळी खेचून दोघांनी मोटारसायकलने पलायन केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

The two escaped by pulling the gold chain of the old man who was doing the morning walk | मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी खेचून दोघांचे पलायन

मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी खेचून दोघांचे पलायन

ठळक मुद्दे मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी खेचून दोघांचे पलायनजबरी चोरीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका ६० वर्षीय वृद्धेची पाऊण लाखाची सोनसाखळी खेचून दोघांनी मोटारसायकलने पलायन केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर रोड, ब्रम्हांड येथे राहणारी ही महिला तिच्या मुलासह ८ जून रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास स्विस्तक पाम्स, काब्रा गॅलक्सीकडे जाणार्या रस्त्याने जात होती. त्याचवेळी २५ ते ३० वयोगटातील दोघेजण एका मोटारसायकलने आले. त्यांच्यापैकी मागे बसलेल्याने तिच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The two escaped by pulling the gold chain of the old man who was doing the morning walk