दिवा स्थानकात एक्स्प्रेसने दुचाकीला उडवले, दोघांचा मृत्यू़
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 12:31 IST2018-06-18T12:31:27+5:302018-06-18T12:31:27+5:30
दिवा स्थानकामध्ये बंद फाटक ओलांडून जात असलेल्या दुचाकीला भरधाव एक्स्प्रेसने उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

दिवा स्थानकात एक्स्प्रेसने दुचाकीला उडवले, दोघांचा मृत्यू़
ठाणे - दिवा स्थानकामध्ये बंद फाटक ओलांडून जात असलेल्या दुचाकीला भरधाव एक्स्प्रेसने उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.
सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास दिवा स्थानकातील फाटक बंद असताना दोन दुचाकीस्वार तरुणांनी फाटक ओलांडून पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान ट्रॅकवरून जात असलेल्या भरधाव एक्स्प्रेसने दुचाकीला उडवले. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.