शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मटकाकिंग बाबू नाडरवर खुनी हल्ला करणारे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार

By जितेंद्र कालेकर | Updated: September 23, 2019 23:11 IST

ठाण्यात मटकाकिंग बाबू नाडर याच्यावर चाकूने खूनी हल्ला करणाऱ्या हरेष तेलूरे याला कोपरी पोलिसांनी ठाणे न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सोमवारी आणले होते. न्यायालयाने त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

ठळक मुद्देहल्लेखोरास पोलीस बंदोबस्तामध्ये आणले न्यायालयातपाच दिवसांची मिळाली पोलीस कोठडीनाडरवर झाल्या पोटावर दोन यशस्वी शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मटकाकिंग बाबू नाडरवर खुनी हल्ला करणारा हरेष तेलुरे (२८) याच्यासह त्याचाच सतरावर्षीय अल्पवयीन भाऊ हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. हरेषवर चार तर त्याच्या भावावर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेच्या सहा दिवस आधीच अल्पवयीन भाऊ बालसुधारगृहातून सुटला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली.हरेष याच्यासह तिघांनाही ताब्यात घेतल्याचे अंबुरे यांनी कोपरी पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नाडरवर सतरावर्षीय या हल्लेखोराने पूर्ववैमनस्यातून चाकूचे सात ते आठ वार केले. बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्याप्रकरणी त्याला तीन महिन्यांपूर्वीच कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची भिवंडी बालन्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली होती. याच गुन्ह्यात त्याची एक आठवड्यापूर्वीच सुटका झाल्याने तो बाहेर आला होता. नाडरच्या माणसांशी त्याचा वाद झाल्याने त्याने आपल्या दोन्ही भावांच्या मदतीने त्याच्यावर २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास खुनी हल्ला केला. त्यावेळी हा हल्ला सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा-या विनोद मोहिते (४०) याच्यावरही त्याने हल्ला केला होता. यात नाडर गंभीर तर मोहिते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, नाडर याच्या पोट आणि पाठीवर दोन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया एका खासगी रुग्णालयात पार पडल्या असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्याप्रकरणी हरेष तेलुरे याच्यासह त्याच्या १७ आणि १६ वर्षीय दोन अल्पवयीन भावांनाही पोलिसांनी कसारा रेल्वेस्थानक येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हरेषला सोमवारी राज्य राखीव दलासह मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे..........................गुन्हेगारी पार्श्वभूमीहल्लेखोरांपैकी हरेष याच्यावर हाणामारीचे चार गुन्हे नोंद आहेत. तर, त्याच्या सतरावर्षीय भावावरही खुनाच्या प्रयत्नासह सहा गुन्हे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने सात महिन्यांपूर्वीही एकाच्या भांडणात मध्यस्थी करणाºया हरुण रेलवानी यांच्यावर खुनी हल्ला केला होता. हरुण याने त्याला चोरीच्या गुन्ह्यातही पकडून दिले होते. याच रागातून हरुण याच्याही पोटावर त्याने वार केले होते. व्यसनी आणि कोणताही कामधंदा न करणारा हा हल्लेखोर नशेच्या आहारी गेल्यानंतर असे गैरप्रकार करीत असल्यामुळे पोलिसांपुढे त्याची डोकेदुखी झाल्याचे बोलले जाते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक