भिवंडीमध्ये खदानीत बुडून दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 21:58 IST2023-07-06T21:57:12+5:302023-07-06T21:58:31+5:30

गणेश जोशी (१०) व पंकज जोशी (१५) दोघे रा.न्यू ओसवाल पार्क अंजूरफाटा, अशी मृत भावांची नावे आहेत.

Two cousins die after drowning in water in Bhiwandi | भिवंडीमध्ये खदानीत बुडून दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू 

भिवंडीमध्ये खदानीत बुडून दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू 

भिवंडीभिवंडी शहरा नजिक असलेल्या अंजूरफाटा खारबाव रस्त्यावर खदानीत साचलेल्या पाण्यात खेळायला गेलेल्या दोघा सख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गणेश जोशी (१०) व पंकज जोशी (१५) दोघे रा.न्यू ओसवाल पार्क अंजूरफाटा, अशी मृत भावांची नावे आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हे दोघे चुलत भाऊ या पाणी साचलेल्या ठिकाणी खेळायला आले असता त्यांना शेतात पाणी साचल्याचा भास झाला आणि त्या पाण्यात तरंगणाऱ्या लाकडाच्या ओंडक्यावर दोघांनी उभे राहण्याचा प्रयत्न केला. मात्र ओंडका कलंडल्याने हे दोघेही पाण्यात पडले. यानंतर, त्यांच्या सोबत असलेल्या इतर मुलांनी याची माहिती कुटुंबीयांना दिल्या. नंतर पाण्यात शोधाशोध करून दुपारच्या सुमारास, या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी नारापोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेने जोशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Two cousins die after drowning in water in Bhiwandi