दोन भावांनी केला चुलत भावांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:52 IST2018-01-15T23:37:21+5:302018-01-15T23:52:39+5:30

Two brothers tortured minor girls of cousins | दोन भावांनी केला चुलत भावांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार

दोन भावांनी केला चुलत भावांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार

ठळक मुद्देसहा वर्षाच्या मुलींना खाऊ चे आमिषआरोपी बंधूंचा राजकीय पक्षाशी हितसंबध असल्याने अटक नाही,ग्रामस्थांचा आरोप



भिवंडी : तालुक्यातील जू-नांदुर्खी गावात रहाणा-या दोन सख्ख्या भावांनी आपल्या दोन चुलत भावांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस फरार या भावांच्या शोधात फिरत आहेत.
विकास काशिनाथ पाटील(२३) व विनायक काशिनाथ पाटील (२०)हे दोन भाऊ आपल्या दोन चुलत भावांच्या सहा वर्षाच्या मुलींना खाऊ चे आमिष दाखवून आपल्या घरी बोलवायचे. त्या आमिषाने घरांत आलेल्या आपल्या दोन अल्पवयीन पुतणींवर ते वारंवार अत्याचार करीत होते.त्यापैकी एका मुलीस शारिरीक वेतना असह्य झाल्याने तीने ही घटना आपल्या आईस सांगीतली. त्यामुळे झालेला प्रकार उघडकीस आला. मुलींच्या घरच्या लोकांनी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली.या तक्र्रारीचा तपास केला असता दोन्ही काकांनी अत्याचार केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याची माहिती तालुका पोलीसांनी दिली. या प्रकरणी विकास पाटील व विनायक पाटील यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी पाटील बंधूंचा राजकीय पक्षाशी हितसंबध असल्याने त्यांना आद्याप अटक केली नाही,असा आरोप जुनांदुर्खी परिसरांतील ग्रामस्थांकडून केला जात आहे.


 

Web Title: Two brothers tortured minor girls of cousins