ठाण्यात चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 00:27 IST2020-11-04T00:20:06+5:302020-11-04T00:27:12+5:30

चाकूच्या धाकावर रिक्षात झोपलेल्या गणेश राऊत (३५) याच्या मोबाइलची जबरी चोरी करणाºया नदीम चौधरी (३५) आणि आतीफ जब्बार (२५) या दोघांना चितळसर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच सोमवारी अटक केली. दोघांनाही ७ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Two arrested for robbery in Thane | ठाण्यात चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

चितळसर पोलिसांची कारवाई

ठळक मुद्दे चितळसर पोलिसांची कारवाईचाकूसह सहा मोबाइल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चाकूच्या धाकावर रिक्षात झोपलेल्या गणेश राऊत (३५, रा. तुळशीधाम, ठाणे) याच्या मोबाइलची जबरी चोरी करणाºया नदीम इलीयास चौधरी (३५, रा. मीरा रोड, ठाणे) आणि आतीफ जब्बार (२५, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या दोघांना चितळसर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून चाकूसह, आठ मोबाईल आणि मोटारसायकल असा एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तुळशीधाम, धर्मवीर नगर येथे राहणारा गणेश हा काही वैयक्तिक कारणामुळे २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मानपाडा भागातील एका रिक्षात झोपला होता. त्याचवेळी तिथे आलेल्या नदीम आणि त्याच्या साथीदाराने चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील सात हजारांचा मोबाइल जबरीने चोरुन नेला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक धनराज केदार यांच्या पथकाने संशयितरित्या फिरणाºया नदीमसह दोघांनाही मानपाडा भागातून ताब्यात घेतले. मोटारसायकलीच्या तपासणीत चाकू तसेच आठ मोबाइल आणि मोटारसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. त्यांनी यापूर्वीही नारपोली आणि मुंब्रा या परिसरात अशाच प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे चौकशीत उघड झाले. दोघांनाही ७ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Two arrested for robbery in Thane