गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दाेघांना ठाण्यातून अटक, उत्पादन शुल्क विभागाची उत्तरशीव भागात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:23 IST2025-11-04T20:21:56+5:302025-11-04T20:23:13+5:30
मद्यासह एक काेटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दाेघांना ठाण्यातून अटक, उत्पादन शुल्क विभागाची उत्तरशीव भागात कारवाई
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाने परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदा तस्करी हाेणाऱ्या गाेवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनचालक मोहम्मद सलमानी आणि देवेंद्र मेघवाल यांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या काेकण विभागीय उपायुक्त प्रविण पवार यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून एक काेटी पाच लाख ६० हजारांच्या मद्यासह एक काेटी ३१ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पनवेल-मुंब्रा रोडवरून गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची वाहतूक हाेत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे डाेंबिवलीचे निरीक्षक डी. बी. काळेल यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनात काळेल यांच्या पथकाने ४ नाेव्हेंबर राेजी सकाळी ९ वाजता पनवेल- मुंब्रा राेडवरील उत्तरशीव भागात सापळा रचून एका सहा चाकी ट्रकची तपासणी केली. याच तपासणीत ट्रकमध्ये तब्बल एक हजार बाॅक्समध्ये विदेशी मद्याचा साठा आढळला. या कारवाईमध्ये ट्रक चालक सलमानी आणि त्याचा साथीदार देवेंद्र या दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून एक काेटी पाच लाख ६० हजारांचे भारतीय बनावटीचे गाेवा निर्मित विदेशी मद्य जप्त केले आहे. या दाेन्ही आराेपींिवरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.