शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीस तास आग, ३० कोटींचा बांबू खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:01 IST

अग्नितांडवामुळे बल्लारपूर - आलापल्ली मार्ग आठ तास बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर (जि. चंद्रपूर) : वणवा भडकून कळमना बांबू डेपोला रविवारी लागलेली आग तब्बल २० तास धुमसत होती. त्यात ५० हजार टन बांबू व निलगिरीचे लाकूड खाक झाले असून, ३० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बल्लारपूरहून आलापल्लीकडे कळमना मार्गाने जाणारी वाहतूक आगीमुळे आठ तास बंद ठेवण्यात आली होती. आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही.  कळमनाच्या चोरमोडी नाल्याजवळ कोणी तरी आग लावल्यामुळे रविवारी सकाळपासून वणवा पेटला होता. तो अधिक भडकून बांबू डेपोपर्यंत गेला व  डेपोला आग लागली. 

२५ अग्निशमन बंब दाखल  आग विझविण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील अग्निशमन दलाचे बंब व पथक दाखल झाले. बल्लारपूर नगर परिषद, चंद्रपूर महानगरपालिका, दुर्गापूर, घुग्गुस, नागभीड, भद्रावती, राजुरा, गडचांदूर, आवारपूर, उपरवाही, नागपूर, गडचिरोली, चामोर्शी येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या २५ पथकांनी २० तास अविरत मेहनत घेऊन आग बऱ्यापैकी आटोक्यात आणली.

पेट्रोलपंप पूर्ण जळालेडेपो पूर्णपणे जळाल्यानंतर आगीने जवळच्या पेट्रोलपंपालाही कवेत घेतले. सुदैवाने पंप चार दिवसांपासून बंद असल्याने पंपात पेट्रोल आणि डिझेलचा केवळ मृत साठा होता. मात्र, पंप जळाल्याने पंपमालक फुलझेले यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. 

आग कशाने लागली, याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. दोन दिवसांपासून सर्व प्रशासन मिळून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. नुकसान किती झाले, हे सांगता  येणार नाही. अजूनही नुकसान मोजणीचे काम सुरू आहे. - संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलbadlapurबदलापूर