शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

खंडणी प्रकरण : छोटा शकील, इक्बाल कासकरविरूद्ध मोक्का; सात आरोपींविरूद्ध कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 6:17 PM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ छोटा शकील आणि इक्बाल कासकरसह सात आरोपींविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल केले.

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ छोटा शकील आणि इक्बाल कासकरसह सात आरोपींविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल केले. वरिष्ठ अधिका-यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी ही कारवाई करण्यात आली.खंडणी विरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सैयद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना गत महिन्यात अटक केली. जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा एक गुन्हा त्यांच्याविरूद्ध कासारवडवली येथे तर दोन गुन्हे ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एक महिन्याच्या तपासामध्ये पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि आरोपींच्या जबाबातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाले. मोक्काच्या प्रस्तावास वरिष्ठांची मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी सात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. कासारवडवली येथील खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. छोटा शकील, इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सैयद, पंकज गंगर तसेच शम्मी आणि गुड्ड या बिहारच्या दोन शुटर्सविरूद्ध मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सैयद आणि पंकज गंगर हे सध्या पोलीस कोठडीत असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी 1999 साली महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अस्तित्वात आला. या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला सहा महिने अटकपूर्व जामीन मिळत नाही. न्यायालय आरोपीला एक महिन्याची पोलीस कोठडी देऊ शकते. इतर गुन्ह्यांमध्ये तीन महिन्यांच्या आत पोलिसांना आरोपपत्र दाखल करावे लागते. मोक्का अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सहा महिन्यांचा अवधी मिळतो. या गुन्ह्यामध्ये न्यायालय आरोपीला एक महिन्यासाठी पोलीस कोठडीत पाठवू शकते. 

टॅग्स :Crimeगुन्हा