लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वृक्ष प्रत्यारोपण करण्याचे काम माजीवडा भागात ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराकडून सुरु असतांनाच महानगरच्या गॅस वाहिनीला जेसीबीचा धक्का बसल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ही वाहिनी फुटल्यामुळे ४०० कुटूंबीयांना झळ बसली. ही वाहिनी दुरुस्त केल्यानंतर दोन तासांनी हा गॅस पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.ठाण्यातील माजीवडा नाका येथील चौगुले इंडस्ट्रीज सचिनम टॉवर समोर ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वृक्ष प्रत्यारोपणाचे काम एका खासगी ठेकेदारामार्फत सुरु होते. महापालिकेच्या अधिकृत परवानगीने हे काम सुरु असल्यामुळे जेसीबीने या कामासाठी खड्डा घेण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी महानगर गॅसच्या वाहिनीला या जेसीबीचा धक्का लागला. त्यामुळे या वाहिनीतून गॅस गळती सुरु झाली. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन तसेच महानगर गॅसच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, ही वाहिनी दुरुस्तीचे काम होईपर्यंत माजीवाडा गावातील ४०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत केला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा गॅस पुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वृक्ष प्रत्यारोपण: जेसीबीचा महानगरच्या गॅस वाहिनीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 00:24 IST
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वृक्ष प्रत्यारोपण करण्याचे काम माजीवडा भागात ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराकडून सुरु असतांनाच महानगरच्या गॅस वाहिनीला जेसीबीचा धक्का बसल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
वृक्ष प्रत्यारोपण: जेसीबीचा महानगरच्या गॅस वाहिनीला धक्का
ठळक मुद्दे४०० ग्राहकांना बसली झळदोन तासांनी वाहिनी पूर्ववत