शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

श्वेतपत्रिका नव्हे, वस्तुस्थिती मांडणार परिवहन प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:43 IST

बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती.

ठाणे : बेस्टप्रमाणे ठाणे परिवहन सेवेचीही अवस्था होऊ नये यासाठी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची गरज नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधोरेखित केली होती. परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीसुध्दा यावेळी करण्यात आली आहे.पुढील महासभेत श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे; मात्र श्वेतपत्रिका नव्हे, तर परिवहनची वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहन आजही सक्षम असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे.बेस्ट कामगारांनी ९ दिवस संप पुकारला होता. भविष्यात ठाणे परिवहन सेवेची अशीच अवस्था होऊ शकते. त्यामुळे परिवहनच्या कारभारावर राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि गटनेते हणमंत जगदाळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आक्षेप घेतला. जीसीसी कंत्राटावरच त्यांनी आक्षेप घेतला असून, चुकीच्या ठेक्यामुळे परिवहनचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.आता १५० बसेस दुरुस्त करुन त्यासुध्दा जीसीसीवर चालविण्याचा घाट घातला जात असल्यावरही त्यांनी आक्षेप नोंदविला. जीसीसी पध्दतीने परिवहनचे रोजचे ९ लाखांचे नुकसान होत असून वर्षाकाठी हा तोटा तब्बल ३२ कोटींच्या घरात जात असल्याचे त्यांनी लक्षवेधीच्या स्पष्ट केले.परिवहन सेवेमध्ये आस्थापनेवर केवळ २० ते ३० टक्के वाहन चालक काम करीत आहेत. परंतु परिवहन या सर्व कामगारांचा पगार काढत आहे. त्यामुळे आस्थापनेवर ७३ कोटी ८१ लाखांचा खर्च होत आहे. त्यात जीसीसीचा चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव तयार करण्यात आल्याने परिवहनला अंदाजे ५० कोटींच्यावर तोटा सहन करावा लागत असल्याचा मुद्दासुध्दा त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय इतरही मुद्दे उपस्थित करीत पुढील महासभेत परिवहनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३१७ बसेस आहेत. दुरुस्तीअभावी १०० हून अधिक बसेस वागळे आणि कळवा आगारात उभ्या आहेत. यातील ४५ बसेसची दुरुस्तीची मोठी कामे शिल्लक असून उर्वरित बसेस या किरकोळ दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. या बसेस दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच दुरुस्तीचे काम केले जाईल, असे परिवहनचे मत आहे.परिवहनच्या ताफ्यातील ३०० बसेसपैकी वागळे आणि कळवा आगारातून ८० बसेस बाहेर पडत असून, ३० पैकी २७ एसी व्होल्वो बसेस बाहेर पडत आहेत. जीसीसी तत्वावरील १९० पैकी १८० बसेस रस्त्यावर धावत असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे. परिवहनचे दिवसाचे उत्पन्न हे २९ ते ३० लाखांच्या घरात आहे.जास्तीचे उत्पन्न मिळणारपरिवहनच्या ताफ्यातील १५० बसेसची दुरुस्ती करुन त्या जीसीसीवर चालविल्यास भविष्यातील दुरुस्तीचा खर्च वाचणार आहे. जास्तीचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावाही परिवहनने केला आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे परिवहनचा कारभार आजही सुरळीत आहे. परिवहन सेवेत सुधार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोणतीही सार्वजनिक सेवा केव्हाही फायद्यात नसते. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठीच विविध उपाय केले जात असल्याचे मत परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिवहनची जी वस्तुस्थिती आहे, तीच महासभेत मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.