शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

ठाण्यात जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ७६७ रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 2:29 PM

कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टसिंगच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षांवर बंदी घातलेली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी अशा ७६७ रिक्षा चालकांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोना संक्रमण रोखण्यासाठी मोहीमदोन दिवसांत पावणे चार लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टसिंगच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षांवर बंदी घातलेली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी अशा ७६७ रिक्षा चालकांवर कारवाई करुन तीन लाख ८७ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्हयात कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. तसेच, कलम १४४ नुसार जमावबंदीही लागू असून तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही कोरोना संबंधीच्या नियमांचे नागरिकांकडून पालन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रिक्षातही दोनच प्रवाशांना प्रवासाची मुभा असतांनाही मीटरप्रमाणे चालणाºया तसेच शेअर रिक्षामध्येही दोन पेक्षा अधिक प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जात आहे. अशा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षा चालकांविरुद्ध कारवाईचे आदेश उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार १९ फेब्रुवारीपासून ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे.* १९ फेब्रुवारी रोजी अशा ३४१ तर २० फेब्रुवारी रोजी ४२६ रिक्षाचालकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध साथ प्रतिबधक कायदा १८८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये ११ चालकांनी जागीच दंडाची ही रक्कम भरली. उर्वरित चालकांकडून एक लाख ६८ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसूली केली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.* फ्रंट सीटवरुनही सर्रास प्रवासशेअर रिक्षांमध्ये अनेक रिक्षाचालक तर मागे तीन आणि पुढे आपल्या शेजारीच उर्वरित प्रवाशांना बसवून नेतात. अशा फ्रंट सीटवर प्रवासी बसविणाºया १०१ चालकांच्या विरोधातही शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस