कारने पेट घेतल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 22:35 IST2019-09-21T22:35:14+5:302019-09-21T22:35:18+5:30
आगीत कार जळून खाक झाली.

कारने पेट घेतल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाक्यानजीक शनिवारी रात्री आणखी एका कारने पेट घेतल्याची घटना घडली.
अरुण सिदाम याची ही कार असून ते ठाण्याहून नाशिककडे निघाले होते. तेव्हा,रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मध्येच कारमधून धुर येत कारने पेट घेतला. यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आग लागल्याची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या जवणांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
या आगीत कार जळून खाक झाली.दरम्यान,या दुर्घटनेमुळे महामार्गवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली