माळशेज घाटात दरड कोसळली, खोळंब्यानंतर वाहतूक पूर्वव्रत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 20:15 IST2018-07-14T20:13:20+5:302018-07-14T20:15:37+5:30
माळशेज घाटात कोसळलेल्या दरडीचे दगड रस्त्यावर आल्यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती.

माळशेज घाटात दरड कोसळली, खोळंब्यानंतर वाहतूक पूर्वव्रत
माळशेज - माळशेज घाटातील धबधब्याच्या अलिकडील छत्री पॉईंट येथे शनिवारी दुपारी 3.30 वाजता दरड कोसळली. या कोसळलेल्या दरडीचे दगड रस्त्यावर आल्यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविली होती.
माळशेज घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी व कर्मचारी याठिकाणी तातडीने रवाना झाले. त्यानंतर तात्काळ दगड हटविण्याचे काम हाती घेतल्यामुळए काही वेळातच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. येथील राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वाहतूक सुरुळीत झाल्याचेही त्यांनी सांगितले.