आमिष दाखवून उल्हासनगरातील व्यापाऱ्यांची ८४ लाखाला फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: December 9, 2025 17:52 IST2025-12-09T17:52:01+5:302025-12-09T17:52:42+5:30
गुजरात कारखान्यातून कमिशनवर कपडा आणून देण्याचे आमिष दाखवले

आमिष दाखवून उल्हासनगरातील व्यापाऱ्यांची ८४ लाखाला फसवणूक
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील व्यापारी कमल सुरेशलाल केशवानी यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांना गुजरात अहमदाबाद येथून कमिशनवर कपडा आणण्याचे आमिष तरुण बुलचंदाणी याने दाखवून, व्यापाऱ्यांची ८४ लाखाला फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी बुलचंदाणी याच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर पूर्वेतील व्यापारी कमल केशवाणी यांच्यासह अन्य व्यापाऱ्याकडे तरुण बुलचंदाणी हा व्यापारी जाऊन अहमदाबाद, गुजरात येवून कमिशनवर कारखान्यातुन कपडा आणुन देतो. असे सांगितले. मात्र कोणत्याही कपड्याची ऑर्डर दिलेली नसताना बुधचंदानी याने कमल केशवाणी यांच्या अनिता टेक्सटाईल, दिपक अहुजा यांचे परफेक्ट गारमेंट, प्रदीप आहुजा यांचे जीएम फबिक, सुरेशलाल केशवानी यांचे आरती ट्रेडर्स, विजय आहुजा यांचे श्रीहरी टेक्सटाईल, रमेश बलराजन यांचे नारायण फॅब्रिक यांच्या जीएसटी नंबरचा गैरवापर करून पी.एस.के. डेनिम प्रा.ली. अहमदाबाद, गुजरात या कंपनीतून ४७ लाख १४ हजार ५०७ रुपयाचा कपड्याचा माल आणला.
तसेच बलराम हरिसिंधानी यांचे एस.एस. फॅशन नावाचे जीएसटी नंबरचा वापर करून अहमदाबाद, गुजरात येथील वी कॉटन स्पन सिष्टेश्वर फॅब्रिक, लिला फॅब्रिक, जे. के. इंटरनॅशन कंपनीकडुन ३६ लाख ९८ हजार १० रुपये किंमतीचा माल असा एकुण ८४ लाख १२ हजार ५१७ रुपये किंमतीचा माल भूमी ट्रान्सपोर्ट मार्फत उल्हासनगर येथे आणला. सदरचा माल तरुण बुधचंदानी याने कमल केशवाणीसह अन्य व्यापाऱ्यांना न देता परस्पर दुसऱ्यांना विकून, व्यापाऱ्यांची फसवणुक केल्याचा प्रकार सप्टेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या दरम्यान घडला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा. दाखल झाला आहे.