शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पुर्व भागातील फेरीवाल्यांविरोधात व्यापारी संघटनांनी सुरु केले बेमुदत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:15 IST

भाईंदर पुर्वेला नवघर मार्ग, तलाव मार्ग, बाळाराम पाटील मार्ग व रेल्वे स्थानक समांतर मार्ग, नवघर - फाटक मार्ग, महात्मा फुले मार्ग आदी मुख्य रस्ते व पदपथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा मुळे व्यापुन गेले आहेत.

मीरारोड - भाईंदर पुर्व भागातील मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई साठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने तक्रारी करुन महापालिका कारवाई करत नसल्याने भाईंदरच्या व्यापारी संघटना, रहिवाशांनी आज बुधवारपासून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.भाईंदर पुर्वेला नवघर मार्ग, तलाव मार्ग, बाळाराम पाटील मार्ग व रेल्वे स्थानक समांतर मार्ग, नवघर - फाटक मार्ग, महात्मा फुले मार्ग आदी मुख्य रस्ते व पदपथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा मुळे व्यापुन गेले आहेत. आधीच हे रस्ते अतिशय अरुंद असुन त्यावर प्रचंड रहदारी व वाहनांची वर्दळ असते. त्यात फेरीवाल्यांचा अडसर ठरतोच शिवाय गेल्या तीन वर्षात तर नव्याने आलेल्या फेरीवाल्यांची संख्या देखील कित्येक पटीने वाढलेली आहे.फेरीवाले, बाजार वसुली ठेकेदार, पालिका प्रशासन व काही लोकप्रतिनिधींचे चे संगनमत असल्याने या फेरीवाल्यांवर ठोस व नियमीत कारवाई केली जात नाही. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानका पासुन १५० मीटर तर शाळा - महाविद्यालय, रुग्णालय व धार्मिक स्थळां पासुन १०० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असताना देखील न्यायालयाच्या आदेशावर टिच्चुन फेरीवाले सर्रास तेथे बसत आहेत. ना फेरीवाला झोन चे पालिकेने फलक लावले असुनही त्या भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. फेरीवाले वाढतील तेवढा जास्त फायदा बाजार वसुली ठेकेदारासह यात हितसंबंध गुंतलेल्यांचा असतो असे सुत्र सांगतात.महापालिकेला कारवाईसाठी सातत्याने निवेदने देऊन देखील प्रभाग अधिकारी व फेरीवाला निर्मुलन पथका पासुन थेट आयुक्त व लोकप्रतिनिधीं कडुन कठोर कारवाईच होत नसल्याने नागरीकांना चालण्यासाठी रस्ते - पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. वाहनांची मोठी संख्या व वर्दळ असल्याने नागरीकांना जीव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागते. विद्यार्थी, महिला, वृध्दांना तर खुपच जाच सहन करावा लागतोय. ध्वनी व वायु प्रदुषणा मुळे लोकं त्रासली आहेत.संविधानाने दुकान चालकांना त्यांचा व्यवसाय करण्याचा घटनात्मक अधिकार दिला आहे. दुकान चालकाने लाखो रुपयांची आयुष्याची पुंजी लाऊन दुकान खरेदी केले असते. किंवा भाड्याने घेतले असते. पण दुकानां समोर पदपथ - रस्त्यावर अतिक्रमण करुन बसणारया फेरीवाल्यां मुळ स्वत:च्या जागेत सनदशिर मार्गाने आपला व्यवसाय करणारया दुकान चालकांना सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागुन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या भागातील दुकानदारच नव्हे तर रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्था व रुग्णालयांनी सुध्दा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा अशी लेखी मागणी केली असल्याचे भार्इंदर रेडिमेड एण्ड क्लॉथ मर्चंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र गुर्जर यांनी सांगीतले.लोकप्रतिनिधी व पालिकेची ठेकेदार धार्जिणी भुमिका, फेरीवाल्यांना दिले जाणारे संरक्षण पाहता सर्वसामान्य नागरीक व दुकानदार यांना अतोनात त्रास होत असल्याने तीन वेळा आंदोलन करण्याची पत्रे पालिका व पोलीसांना दिली होती. परंतु प्रत्येक वेळी कारवाईचे खोटे आश्वासन दिले गेले. पण आता मात्र या जाचाचा कहर झालेला असुन त्यामुळेच बेमुदत धरणे आंदोलन रहिवाशी, व्यापारी व संस्थांनी सुरु केले आहे असे गुर्जर म्हणाले. घिसुलाल माली, रमेश चौधरी, बाबूभाई माली, सतिश राजपुरोहित, राकेश जैन, श्रवण वैष्णव, किशोर सुराणा, बळीराज गवळी, प्रिन्स जैसवाल, दर्शन पाटील आदी अनेक व्यापारी, रहिवाशी आंदोलनात सहभागी झालेले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन रेल्वे स्थानक, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धार्मिक स्थळांच्या प्रतिबंधित क्षेत्रात बसणाराया, ना फेरीवाला क्षेत्रात बसणाराया तसेच मुख्य वर्दळीच्या रस्ते - पदपथांवर बसणाराया फेरीवाल्यां विरोधात गुन्हे दाखल करावेत, त्यांच्यावर रोज सातत्याने कठोर कारवाई करावी, या फेरीवाल्यांवर कारवाई न करणाराया पालिका अधिकारी - कर्मचारी यांना तातडीने निलंबित करुन भ्रष्टाचार प्रतिबंधत्मक कायदयाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी असल्याचे गुर्जर यांनी सांगीतले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर