गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 03:47 IST2019-02-18T03:47:31+5:302019-02-18T03:47:46+5:30

अनगाव येथील आरोपी हर्षल विजय परदेशी (२४) याचे कोनगावातील मामाकडे जाणेयेणे होते. मागील वर्षी त्याची कोनगावातील पीडित तरुणीशी ओळख झाली होती.

Torture on girl friend by giving a drug | गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर अत्याचार

गुंगीचे औषध देऊन मैत्रिणीवर अत्याचार

भिवंडी : अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीला मामाच्या घरी बोलावून, शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्यानंतर बेशुद्धावस्थेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील कोनगाव येथे घडली.

अनगाव येथील आरोपी हर्षल विजय परदेशी (२४) याचे कोनगावातील मामाकडे जाणेयेणे होते. मागील वर्षी त्याची कोनगावातील पीडित तरुणीशी ओळख झाली होती. त्याने तिच्याशी मैत्रीचे नाटक केले. त्यानंतर, अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने तिला मामाच्या घरी बोलावले. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्धावस्थेत तिच्यावर अत्याचार केला. हे दुष्कृत्य करताना त्याने मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. ही घटना हर्षलचे वडील विजय परदेशी यांना समजताच त्यांनी पीडित तरुणीस फोन करून तुझी जात कोणती, आमची जात कोणती, असे बोलून तिची हेटाळणी केली. तुझे हर्षलसोबत लग्न होणार नाही. तुला काय करायचे ते कर, असे बोलून त्यांनी तिला अपमानीत केले. वडिलांनी दिलेल्या धमकीनंतर हर्षलनेही लग्नास नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने कोनगाव पोलीस ठाण्यात हर्षलविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी हर्षल विजय परदेशी याने अनगाव येथून पळ काढला.
 

Web Title: Torture on girl friend by giving a drug