४१ लाख ८७ हजारांचा तंबाखुजन्य पानमसाला जप्त, एक अटकेत
By अजित मांडके | Updated: April 6, 2024 18:32 IST2024-04-06T18:31:59+5:302024-04-06T18:32:45+5:30
दुसऱ्या एका घटनेत वागळे इस्टेट येथील मॉडेला नाक्याजवळ एका रिक्षात अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला अटक कऱण्यात आले आहे. त्याच्याकडून ११ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४१ लाख ८७ हजारांचा तंबाखुजन्य पानमसाला जप्त, एक अटकेत
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोणातून ठाणे पोलिसांकडून विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. कळवा ब्रीज साकेतरोड दवळ तंबाखुजन्य पदार्थ, पानमसाला बेकादेशीररित्या विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषगांने छापा टाकून टेम्पोसह ४१ हलाख ८७ हजार २३४ रुपये किमतीचा पानमसाला आणि तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे. दुसऱ्या एका घटनेत वागळे इस्टेट येथील मॉडेला नाक्याजवळ एका रिक्षात अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला अटक कऱण्यात आले आहे. त्याच्याकडून ११ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रामक्रित यादव (४) याला अटक करण्यात आले आहे. गुजरात, सुरत मार्गे एका टेम्पोतून तंबाखुजन्य पानमसाला येणारा असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ४ एप्रिल रोजी दुपारी १२.३५ वाजताच्या सुमारास ठाणे नगर पोलिसांच्या पथकाने कळवा ब्रिज, साकेतरोडकडे जाणाºया रोडच्या कोपºयावरील रस्त्यावर गुजरात मार्गे येणाºया टेम्पोवर छापा टाकला असता, त्यात महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखुजन्य पानमसाला, सुगंधी तंबाखु जप्त करण्यात आला. या कारवाईत टेम्पोसह ४१ लाख ८७ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी रामक्रित याला अटक करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तसेच, ५ एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. ५ एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांना आरोपी मनजीत सीताराम सॉ (३६, रा. शास्त्रीनगर, विलेपार्ले) हा वागळे इस्टेट येथील मॉडेला नाक्याजवळ एका रिक्षात अमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून कोकेन, ड्रग्ज, दोन मोबाईल फोन आणि रोख असा ११ लाख ७२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीत काही बड्या टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.