शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

थितबीमध्ये लवकरच अ‍ॅडव्हेंचर गेमचा थरार; पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 1:13 AM

दिवाळीनंतर पर्यटन केंद्राला मिळणार चालना

पंकज पाटील मुरबाड : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ‘थितबी’ या वन पर्यटन केंद्रात आता दिवाळीनंतर पुन्हा जोमाने सुरुवात होणार आहे. वन पर्यटनासोबत अ‍ॅडव्हेंचर गेमही सुरू करण्यात येणार आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असून पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.

पर्यटकांना याठिकाणी रॅपलिंग, रॉक क्लायबिंग, रिव्हर काँसिंग, कंमाडो ब्रिज आदी सोळा प्रकारच्या साहसी खेळांचा आनंद घेता येणार आहे. लहान मुलांसाठीही खास साहसी खेळांची व्यवस्था या वन पर्यटन केंद्राच्या आवारात करण्यात आली आहे. यासाठी प्रशिक्षित युवकांची टीम सज्ज होत आहे. ठाणे जिल्हा नियोजन विभागाने दिलेल्या निधीतून चार वर्षांपूर्वी वनविभागाने माळशेजच्या पायथ्याशी असणाऱ्या थितबी या गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर हे वन पर्यटन ग्राम वसवले. सभोवती घनदाट जंगल, तिन्ही बाजूला सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा, डोंगरमाथ्यावरून वेगाने वाहणाºया काळू नदीचे स्वच्छ, प्रदूषण मुक्तपाणी आणि नीरव शांतता यामुळे अल्पावधीतच हे पर्यटनस्थळ लोकप्रिय झाले.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या केंद्राचे व्यवस्थापन पाहिले जाते. येथील जंगल आणि डोंगर माथ्यावर भटकंती करू इच्छिणाºया पर्यटकांना स्थानिक प्रशिक्षित तरुणांची टीम या निसर्गरम्य ठिकाणांची इत्थंभूत माहिती देण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. स्थानिक युवकांना ‘अ­ॅडव्हेंचर वन झोन’ या संस्थेतर्फे सोळा प्रकारच्या साहसी खेळांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले आहे.वन समिती करणार पर्यटन केंद्राचे व्यवस्थापनमहाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पुढाकाराने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत या वन पर्यटन केंद्राचे व्यवस्थापन पाहिले जाते. संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन केल्यामुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळाला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाºया पर्यटकांना चांगली सुविधा मिळाली असल्याचे सहायक वनक्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनforestजंगल