शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

डोंबिवली स्थानकात रेल्वेचे तीन मजली पार्किंग करा, रवींद्र चव्हाण यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 2:52 AM

येथील रेल्वेस्थानकात पूर्व आणि पश्चिमेला मध्य रेल्वेची पार्किंग सुविधा आहे. ती सुविधा तातडीने तीन मजली करावी, जेणेकरून रेल्वेस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही.

डोंबिवली - येथील रेल्वेस्थानकात पूर्व आणि पश्चिमेला मध्य रेल्वेची पार्किंग सुविधा आहे. ती सुविधा तातडीने तीन मजली करावी, जेणेकरून रेल्वेस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही. तिथे चारचाकी वाहनांसाठीही सुविधा असावी, अशी मागणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली.रायगड जिल्ह्यामधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या तसेच ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, कोपर, दिवा, ठाकुर्ली आदी स्थानकांमधील गैरसोयींसह अपेक्षित सुविधांबाबत चव्हाण यांनी चर्चा केली. वाहनतळासंदर्भात रेल्वेमंत्री गोयल यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना तत्काळ अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. येथील पश्चिमेला असलेल्या रेल्वेच्या भूखंडाची दुर्दशा झाली असून तेथेही तातडीने सर्व सुविधा द्याव्यात, जेणेकरून खेळाडूंना तेथे सराव करणे सोपे जाईल. रेल्वेला शक्य नसेल तर त्या मैदानाच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी चव्हाण यांनी दर्शवली. त्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करून, मैदान खेळाच्या दृष्टीने विकसित करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातून ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमधून लाखो प्रवासी कोकणात जातात. मात्र, दिवा स्थानकात कोकणात जाणाºया गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना कुटुंबासह जातायेताना ठाणे, पनवेल येथून प्रवास करावा लागतो. ते प्रचंड त्रासाचे आहे. त्यासाठी येत्या गणेशोत्सवात नियोजन करताना अधिकाधिक गाड्या दिवा स्थानकातही अपडाउन मार्गावर थांबतील, याची काळजी घ्यावी. अन्यथा, प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, असे ते म्हणाले. त्याबाबतची माहिती घेऊन आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे गोयल म्हणाले. ठाकुर्ली स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूल, डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची डागडुजी, स्वयंचलित जिन्यांच्या समस्या, त्यात वाढ आदी मुद्यांवरही यावेळी चर्चा झाली. स्थानकांमधील स्वच्छतागृहांच्या बकाल अवस्थेवर चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. महिला सुरक्षा, गर्दीच्या वेळांमधील नियोजन, महिला विशेष लोकल आदी मुद्यांवरही गोयल यांच्यासमवेत चर्चा करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार सोमवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के. जैन यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत डोंबिवलीसह ठाकुर्ली, कोपर, दिवा आदी स्थानकांसंदर्भात चर्चा केली.महिनाभरात अहवालरवींद्र चव्हाण यांचे म्हणणे ऐकून घेत महिनाभरात अहवाल देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार ठाकूर हेही उपस्थित होते. दिवा स्थानकात गाड्यांना गणेशोत्सवात थांबा देण्यासंदर्भात रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी सकारात्मक भूमिका घेतली. डोंबिवलीच्या वाहनतळाची कल्पना स्तुत्य असून त्यानुसार तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे