स्की ॲण्ड स्नोबोर्ड राष्ट्रीय स्पर्धेत जिल्ह्यातील तीन खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST2021-02-26T04:55:24+5:302021-02-26T04:55:24+5:30
कल्याण : स्की ॲण्ड स्नोबोर्ड राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुलींच्या गटातून सोनाली शेलार, तर मुलांच्या गटातून शुभम पाटील आणि ...

स्की ॲण्ड स्नोबोर्ड राष्ट्रीय स्पर्धेत जिल्ह्यातील तीन खेळाडू
कल्याण : स्की ॲण्ड स्नोबोर्ड राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुलींच्या गटातून सोनाली शेलार, तर मुलांच्या गटातून शुभम पाटील आणि पंकज कुमार अवधेस कुमार यांची निवड झाली आहे.
शेलार व पाटील यांना सुवर्ण पदके मिळाली असून, पंकजला रौप्य पदक मिळाले आहे.
कश्मीरमधील गुलबर्ग येथे २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय ज्युनिअर स्की ॲण्ड स्नोबोर्ड प्रशिक्षण व स्पर्धा झाली. त्यानंतर ६ फेब्रुवारीला राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. हा खेळ बर्फाच्छादीत खेळला जातो. स्पर्धकाला एक हजार मीटर स्कीचे लक्ष्य पूर्ण करायचे होते. आगामी खेलो इंडिया या स्पर्धेसाठी यातून खेळाडू निवडले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशन व इंडियन ऑलम्पिक असोसिएशन प्रमाणित स्पर्धा आहे. प्रशिक्षक मयूर इंगोले यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. ठाणे जिल्हा स्की ॲण्ड स्नो बोर्ड असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मेने, उपाध्यक्ष महादेव इंगोले, मनोज इंगोले, सदस्य सिद्धेश दरेकर, राकेश अहिरेकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
---------------