ठाण्यातून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता
By जितेंद्र कालेकर | Updated: February 29, 2024 22:02 IST2024-02-29T21:59:25+5:302024-02-29T22:02:23+5:30
श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार: शोधासाठी दोन पथके

ठाण्यातून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता
ठाणे: ठाण्यातील किसनगर, वागळे इस्टेट भागातील दोन १५ वर्षीय आणि एक १४ वर्षीय अशी तीन मुले बेपत्ता झाली आहे. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त करीत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
किसननगर भागातील रहिवासी असलेली ही तिन्ही मुले २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ६.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घरातून बाहेर पडले. परिसरात आणि नातेवाईकांकडे सर्वत्र शाेध घेउनही त्यांचा शाेध लागला नाही.
त्यांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्यांच्या पालकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा २९ फेब्रुवारी रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी दोन पथकांची नियुक्ती केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण काबाडी यांनी दिली.