खडवलीच्या भातसा नदीत तिघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:34 AM2018-03-13T02:34:14+5:302018-03-13T02:34:14+5:30

उल्हासनगरातील शासकीय प्रसूती रुग्णालयातील पाच कर्मचारी रविवारी सहलीसाठी खडवली येथील भातसा नदीकिनारी गेले. तेथील नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच पैकी तिघांचा बुडून मुत्यू झाला.

Three damaged in the river Bhatsa in Khadavali | खडवलीच्या भातसा नदीत तिघे बुडाले

खडवलीच्या भातसा नदीत तिघे बुडाले

Next

उल्हासनगर / टिटवाळा : उल्हासनगरातील शासकीय प्रसूती रुग्णालयातील पाच कर्मचारी रविवारी सहलीसाठी खडवली येथील भातसा नदीकिनारी गेले. तेथील नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच पैकी तिघांचा बुडून मुत्यू झाला. तर दोन जण सुखरूप बचावले आहेत.
कॅम्प नं.-४ येथे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयात वरिष्ठ लिपिक कैलास बच्चाव, कनिष्ठ लिपिक राजेंद्र तायडे, शिपाई धर्मवीर पाटील तर कंत्राटीपद्धतीवर काम करणारे संगणक आॅपरेटर विक्रांत नेमाडे व सचिन पोळ असे पाच जण रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी खडवली येथे गेले होते. दुपारी ते भातसा नदी पात्रात पोहण्यास उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने पाटील, तायडे व नेमाडे हे बुडाले. तर नदीकिनारी असलेले बच्चाव व पोळ वाचले.

Web Title: Three damaged in the river Bhatsa in Khadavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.