शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींची पाणीपट्टी थकीत

By admin | Updated: November 9, 2015 02:46 IST

महाड तालुक्यातील एकूण १९ गावांना व महाड नगर पालिकेला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो.

बिरवाडी : महाड तालुक्यातील एकूण १९ गावांना व महाड नगर पालिकेला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचे ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत ३ कोटी ४ लाख ३ हजार ४६ रूपये एवढी पाणीपट्टी निव्वळ रक्कम थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.महाड औद्योगिक विकास महामंडळाकडून आसनपोई ग्रामपंचायतीची निव्वळ थकीत पाणीपट्टी १५ लाख ९४ हजार ५९२ रूपये, कांबळे १० लाख ८४ हजार ३८५ रूपये, सवाणे (खैरे) १० लाख ४७ हजार ६५ रूपये, सवाणे बौध्दवाडी ३ लाख १३ हजार ७३ रूपये, नडगाव (नांगलवाडी) २ हजार ९५ रूपये, नडगाव बौध्दवाडी ५ हजार ७४८ रूपये, नडगांव अरूण नगर वजा ९ हजार ९५३ रूपये, जिते (टेमघर) २ लाख ७८ हजार ६९० रूपये, काळीज ६ लाख २२ हजार ६३३ रूपये, बिरवाडी ४ लाख ३५२७१ रूपये, खरवली ६ लाख २५ हजार ९९४, धामणे वजा ५० हजार ६७२, आमशेत कोंड वजा १ हजार ४९७, नडगाव काळभैरव वजा ५९०, नडगाव (जवळ पिडीलाईट) वजा ४ हजार ६९६ रूपये, नडगाव सोमजाई मंदिर वजा २७७१ रूपये, आमशेत ९२ हजार ९८१ रूपये, महाड नगर पालिका २ कोटी ४२ लाख ४८ हजार ९७२ रूपये, बिरवाडी कुंभारवाडा ८२ हजार ६५८ रूपये, जिते ३९ हजार ६८ रूपये एकूण ४ कोटी ३ हजार ४६ रूपये एवढी निव्वळ पाणीपट्टी रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत थकीत असल्याची माहिती महाड एमआयडीसी पाणीपट्टी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.या सर्व थकीत पाणीपट्टी दंडनीय रक्कम व विलंब शुल्कासह एकूण ११ कोटी ६४ लाख ५४ हजार ७५९ रूपये एवढी आहे. मात्र निव्वळ रक्कम भरल्यावर दंडाची सर्व रक्कम संबंधित ग्रामपंचायती, नगर पालिका यांना माफ करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सी.एन.पाटील यांनी दिली आहे. ग्रामपंचायतींना सवलती देण्यात येत असल्या तरी पाणीपट्टी वसुली वेळेत होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या थकीत पाणीपट्टीचे प्रमाण वाढत जाते, परिणामी ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा खंडित केला जातो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)