गुंतवलेले पैसे मागितले म्हणून बलात्कार व विवस्त्र व्हिडीओ काढून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

By धीरज परब | Updated: May 7, 2025 21:45 IST2025-05-07T21:45:20+5:302025-05-07T21:45:37+5:30

Mira Road Crime News: एका महिलेस व्यवसायात पैसे गुंतवायला लावून पैसे मागितले असता तिला गुंगीकारक पेय देऊन विवस्त्र करत व्हिडीओ काढून धमकावले व बलात्कार केल्याच्या फिर्यादी नुसार मीरारोड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Three booked for raping, filming nude video and beating her for demanding money invested | गुंतवलेले पैसे मागितले म्हणून बलात्कार व विवस्त्र व्हिडीओ काढून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

गुंतवलेले पैसे मागितले म्हणून बलात्कार व विवस्त्र व्हिडीओ काढून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

मीरारोड - एका महिलेस व्यवसायात पैसे गुंतवायला लावून पैसे मागितले असता तिला गुंगीकारक पेय देऊन विवस्त्र करत व्हिडीओ काढून धमकावले व बलात्कार केल्याच्या फिर्यादी नुसार मीरारोड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मीरारोड भागात राहणाऱ्या महिलेची नफिसा रा. एव्हरशाईन वुड, २२ क्रमांक बस स्टॉप जवळ, मीरारोड सोबत ओळख होती. नफिसा हिने पीडितेस दागिने पॉलिश करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने नफिसा हीच पती पती अब्दुल समद व त्याचा मित्र सनवेज उपाध्याय यांच्या बँक खात्यांवर ३६ लाख ५५ हजार रुपये गुंतवले.  गुंतवणुकीचा नफा म्हणून महिलेस २७ लाख ८० हजार रुपये महिलेस देण्यात आले. 

उर्वरित पैसे मागण्यासाठी मार्च २०२४ पीडिता हि नफिसा हिच्या घरी गेली असता तिला पाणी व कॉफी दिली. ती पिऊन तिला गुंगी आली असता समद ह्याने तिच्यावर  जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ती बेडवर विवस्त्र अवस्थेत असताना नफिसा व समद यांनी यांनी व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. 

पीडितेच्या फिर्यादी नुसार मीरारोड पोलिसांनी समद, नफिसा व उपाध्याय विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रामेश्वर पडवळ तपास करत आहेत. 

Web Title: Three booked for raping, filming nude video and beating her for demanding money invested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.