शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

साडेतीन लाख नवमतदार नोंदणी, राज्यात ठाण्याचा प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:11 IST

गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला.

ठाणे : येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. यावेळी ठाण्यातील नवमतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली. एवढेच नव्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मराठी चित्रपट, मालिका कलाकारांनीदेखील आपल्यावरील मतदानाविषयी निरुत्साही असण्याचा शिक्का पुसून काढून मतदान यादीत नाव नोंदविल्याचा तसेच मतदान करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागानेआयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात येऊन राज्यात प्रथम असल्याचे सांगितले. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकेची भूमिका करणारी अनिता दाते म्हणाल्या की, आता ‘आपला वॉर्ड, आपला माणूस’ या चक्र ाभोवती न अडकता एक जबाबदार उद्याचा नागरिक म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करा. मी नाव नोंदवूनदेखील ते मतदार यादीत आले नव्हेत किंवा कसे गायब झाले कळले नव्हते, पण तरीही मी त्याचा पाठपुरावा करून आपले नाव पुढील वेळेस कसे मतदान यादीत येईल, हे पाहिले.अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, तुम्ही जर मतदान करणार नसाल तर तुम्हाला व्यवस्थेवर बोलण्याचा काही हक्क नाही, त्यामुळे हे कर्तव्य तुम्ही बजावलेच पाहिजे. ज्या व्यक्ती मतदानाचा अधिकार बजावत नाही, त्याना प्रस्थापित सरकारच्या विरोधात बोलण्याचा अजिबात हक्क नाही किंबहुना मतदान न केल्यामुळे तुम्ही तो गमावता असे ते म्हणाले. यावेळी कलाकारांना निवडणूक विभागातर्फे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यिक्षक दाखिवण्यात आले.युवा मतदारांसाठी घेतलेल्या निबंध, वक्तृत्त्व, रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या मुलांनी पथनाट्य सादर केले. तर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील नवोदित मतदार, दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधिक स्वरूपाते प्रमाणपत्रे देण्यात आले. उल्लेखनीय काम करणाºया अधिकारी व कर्मचारी यांनाही यावेळी गौरविले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर, उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी, उपेंद्र तामोरे, तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील, उपस्थित होते. अभिनेता अभिजित खांडकेकर याने सांगितले की, मी आवर्जून मतदान करणार आहे आणि तुम्हीसुद्धा मतदान केलेच पाहिजे. इशा केसकर हिनेदेखील तुम्ही आता बच्चा नसून सुजाण नागरिक आहात. ज्यावेळी तुम्ही मतदानाचा अधिकार राबवाल त्याचवेळी एखाद्या सरकारी यंत्रणेविरोधात आवाज उठवण्याचा हक्क आहे, अन्यथा नाही. आपण मतदान करणार असून कितीही व्यस्त असलो तरी हे कर्तव्य बजावणारच आहे असे सांगितले.>सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण, मुरबाडमध्येयंदाच्या मतदार दिनाचे घोषवाक्य ‘ नो व्होटर्स, टू बी लेफ्ट बिहार्इंड’ असे असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून मतदान करावे असा उद्देश आहे ,असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदार नोंदणीमध्ये सर्वाधिक ४० हजार २२९ कल्याण ग्रामीणमध्ये, तर मुरबाडमध्ये ३७ हजार १६७ नावे नोंदविण्यात आली. ऐरोली २० हजार १६२, मुंब्रा कळवा १८ हजार ५९७, मीरा भार्इंदर २२ हजार ७१४ , भिवंडी ग्रामीण १८ हजार ६९५, शहापूर १३ हजार २०१, भिवंडी पश्चिम १९ हजार ४११, भिवंडी पूर्व १४ हजार ९५०, कल्याण पश्चिम ३३ हजार ९६७, अंबरनाथ १७ हजार १३२, उल्हासनगर १० हजार १३०, कल्याण पूर्व १७ हजार १९९, डोंबिवली १० हजार ७०३, ओवळा माजिवडा २१ हजार ३०३, कोपरी ७ हजार ७६३ अशी १८ मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीची आकडेवारी आहे.