वडिलांविरुद्धची केस मागे घेण्याची धमकी, मुलाचा आईवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:58 IST2017-11-10T00:58:43+5:302017-11-10T00:58:50+5:30

न्यायालयात वडिलांविरुद्ध दाखल केलेली केस मागे घेण्याची धमकी देऊन दलजित संधू (५१) यांची सोनसाखळी हिसकावून लकी संधू या त्यांच्या मुलाने आपल्या दोन साथीदारांसह पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली

The threat of withdrawal of the case against the father, the child's mother was attacked | वडिलांविरुद्धची केस मागे घेण्याची धमकी, मुलाचा आईवर हल्ला

वडिलांविरुद्धची केस मागे घेण्याची धमकी, मुलाचा आईवर हल्ला

ठाणे : न्यायालयात वडिलांविरुद्ध दाखल केलेली केस मागे घेण्याची धमकी देऊन दलजित संधू (५१) यांची सोनसाखळी हिसकावून लकी संधू या त्यांच्या मुलाने आपल्या दोन साथीदारांसह पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात मुलाविरुद्धच आईने जबरी चोरीसह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
घोडबंदर रोडवरील कॉसमॉस पार्क आयब्रिज इमारतीमध्ये राहणाºया दलजित या ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वाघबिळ येथील ग्रीन एकर्स सोसायटीतील एका पोळीभाजी केंद्रातून पार्सल आणि मेडीकलमधून औषधे घेऊन घरी पायी येत होत्या. त्याच वेळी ग्रीन एकर्स सोसायटीसमोर दुचाकीवरुन आलेल्या लकी (३३) याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने आईवरच हात उगारला. तिला मारहाण करून तिच्या गळयातील अडीच तोळयांची सोनसाखळी हिसकावली. माझ्यासह वडिलांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली केस मागे घे, नाहीतर तीन दिवसांत पुन्हा मारेल, अशी धमकी देऊन त्याने दुचाकीवरुन पलायन केले. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. पवार हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The threat of withdrawal of the case against the father, the child's mother was attacked

टॅग्स :Crimeगुन्हा