शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्वखर्चाने चाचणी करणाऱ्यांनाच भरावे लागणार तीन हजार शुल्क; केडीएमसीचे घूमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 06:25 IST

वाढत्या विरोधामुळे केला खुलासा, प्रशासन पडले तोंडघशी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने खासगी लॅबसोबत करार करून कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात कोरोना टेस्टची सुविधा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी एका व्यक्तीला कोरोना टेस्टसाठी तीन हजार रुपये आकारले जात होते. त्याला विरोध झाल्यानंतर महापालिकेने घूमजाव करत स्वखर्चाने टेस्ट करू इच्छिणाऱ्यांनाच हे शुल्क आकारले जात असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे शुल्क आकारणी प्रकरणी महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सुरुवातीला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात जावे लागत होते. १ एप्रिलपासून महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी मुंबईतील हाफकिन संस्थेत पाठवले जात होते. त्यासाठी कोणतेही शुल्क नव्हते. महापालिकेने आठ ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू केले आहेत. कोरोनाची लक्षणे आढळणाºयांना भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रण येथे ठेवले जात असून स्वखर्चाने कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांना खासगी टेस्ट लॅब उपलब्ध केली आहे.

पिवळे व केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांची कोरोना टेस्ट मोफत केली जात आहे. आतापर्यंत डोंबिवलीतील कोविड शास्त्रीनगर रुग्णालयात व टाटा आमंत्रण येथे एक हजार ४९५ जणांची मोफत टेस्ट केली आहे. तर, खासगी लॅबमध्ये एक हजार ६५४ नागरिकांनी स्वेच्छेने टेस्ट केली आहे. खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी चार हजार ५०० रुपये आकारले जातात.

रुक्मिणीबाई रुग्णालयात क्रेष्णा डायग्नोस्टिक लॅब ही केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तीन हजार रुपये शुल्क आकारत आहे. तरीही टेस्टसाठी जास्त पैसे उकळत असल्याचा कांगावा करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.

उपचारांचा खर्चही माफ करा !

टेस्ट आणि उपचार मोफत व्हावे यासाठी मनसे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मागणी केली होती. टेस्टच्या शुल्क आकारणीप्रकरणी महापालिकेने घूमजाव केले असले तरी उपचाराचा खर्च अद्याप आकारला जात आहे. तोही जास्त असून तो माफ केला जावा, अशी मागणी या लोकप्रतिनिधींनी उचलून धरली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे