दुचाकीवरुन आलेल्यांनी केली तरुणीच्या मोबाईलची जबरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 21:35 IST2021-07-28T21:33:48+5:302021-07-28T21:35:52+5:30
दुचाकीवरुन आलेल्यां २० ते २५ वयोगटातील दोघांनी एका २१ वर्षीय तरुणीच्या मोबाईलची जबरी चोरी केल्याची घटना नुकतीच मीनाताई ठाकरे चौकात घडली.

दुचाकीवरुन आलेल्यांनी केली तरुणीच्या मोबाईलची जबरी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दुचाकीवरुन आलेल्यां २० ते २५ वयोगटातील दोघांनी एका २१ वर्षीय तरुणीच्या मोबाईलची जबरी चोरी केल्याची घटना नुकतीच मीनाताई ठाकरे चौकात घडली. याप्रकरणी मंगळवारी या तरुणीने राबोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्याच्या उथळसर भागात राहणारी ही २१ वर्षीय तरुणी ३ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास माजीवडा येथून आपल्या मैत्रिणीसमवेत चालत मीनाताई ठाकरे चौकात स्वागत हॉटेल समोरील रस्त्यावरुन फोनवर बोलत जात होती. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने तिच्या हातातील दहा हजारांचा मोबाईल खेचून उथळसरच्या दिशेने पलायन केले. पोलीस हवालदार संतोष कुलथे हे अधिक तपास करीत आहेत.