ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात

By जितेंद्र कालेकर | Updated: January 3, 2024 21:55 IST2024-01-03T21:55:22+5:302024-01-03T21:55:44+5:30

अजित पवार गटाचा आक्रमक पवित्रा: वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

Those protesting in front of Jitendra Awhad's house in Thane are in police custody | ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात

ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील अधिवेशनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्री राम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल ठाण्यात अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर अचानक बुधवारी रात्रीच्या वेळी आंदोलन केले. यावेळी राजू वाघमारे यांच्यासह चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सध्या शिर्डी येथे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. याच अधिवेशनामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आमदार आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी केला आहे. आव्हाड यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून त्या निषेधार्थ हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे राजू वाघमारे यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकाने धाव घेत वाघमारे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Those protesting in front of Jitendra Awhad's house in Thane are in police custody