शेजाऱ्याशी भांडणातून चिमुरडीचा केला खून, दहावीच्या विद्यार्थिनीचे निर्घृण कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:35 IST2019-01-21T06:35:34+5:302019-01-21T06:35:47+5:30

शेजारी राहत असलेल्या नातलगाशी होत असलेल्या वादातून अवघ्या दोन वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील तुळई येथे शनिवारी घडली.

Thirty-five-year-old girl gets murdered | शेजाऱ्याशी भांडणातून चिमुरडीचा केला खून, दहावीच्या विद्यार्थिनीचे निर्घृण कृत्य

शेजाऱ्याशी भांडणातून चिमुरडीचा केला खून, दहावीच्या विद्यार्थिनीचे निर्घृण कृत्य

मुरबाड/टोकावडे : शेजारी राहत असलेल्या नातलगाशी होत असलेल्या वादातून अवघ्या दोन वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील तुळई येथे शनिवारी घडली. आरोपी मुलगीही १५ वर्षांची असून, तिला पोलिसांनी अटक केली आहे. मुरबाड तालुक्यातील तुळई गावातील अनुष्का जाधव ही दोन वर्षीय मुलगी शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता झाली होती.

बरीच शोधाशोध केल्यानंतर मुलीचे पालक भाऊ जाधव यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शनिवारी रात्रीच या गावात जाऊन शोधमोहीम सुरू केली असता, तिच्या शेजारील मुलीकडे अनुष्का दुपारी दिसल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता, अनुष्का सर्वात शेवटी शेजारी मुलीकडेच दिसल्याची खातरजमा झाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक विकास निकम यांनी शेजारील मुलीचे घर गाठले. त्या वेळी आरोपी मुलगी गाढ झोपेत होती. तिला विचारणा केली असता, तिच्या बोलण्यात विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तिच्या घराची झडती घेतली असता, घराच्या पोटमाळ्यावर अनुष्काचा मृतदेह मिळाला. त्यानंतर, पोलिसी खाक्या दाखविताच तिने अनुष्काला आपणच गळा आवळून ठार केल्याची कबुली दिली.
आरोपी मुलगी अवघी १५ वर्षांची असून, ती दहावीची विद्यार्थिनी आहे. ती आणि मृत अनुष्काचे कुटुंब हे जवळचे नातलग आहेत. त्यांच्यात दिवाळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्या रागातूनच अनुष्काचा खून केल्याची कबुली तिने दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे व पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
>आरोपी विद्यार्थिनीची आई आणि मृत अनुष्काची आई यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. याच रागातून तिने अनुष्काचा खून केला. आरोपी बालगुन्हेगार आहे. तिला सोमवारी भिवंडी न्यायालयासमोर हजर केले जाईल.
- अजय वसावे,
पोलीस निरीक्षक, मुरबाड

Web Title: Thirty-five-year-old girl gets murdered