ठाण्यातील खोपट परिसरात चोरी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 23:49 IST2020-12-21T23:47:19+5:302020-12-21T23:49:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खोपट, तसेच कोलबाड परिसरात चोरी करणाºया सलमान अहमद खान (२७, रा. राबोडी, ठाणे ) ...

The thief was arrested in Khopat area of Thane | ठाण्यातील खोपट परिसरात चोरी करणाऱ्यास अटक

राबोडी पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्दे दोन चोऱ्यांची उकलराबोडी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खोपट, तसेच कोलबाड परिसरात चोरी करणाºया सलमान अहमद खान (२७, रा. राबोडी, ठाणे) याला राबोडी पोलिसांनी शनिवारी अटक केली असून, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
सलमान याने ९ डिसेंबर रोजी खोपट येथील एका घराच्या खिडकीचे गज वाकवून १२ हजारांची रोकड चोरली होती, तर १२ डिसेंबर रोजी कोलबाड येथील एका दुकानातून ड्रिल मशिन आणि १४ हजारांची रोकड त्याने चोरली होती. या दोन्ही प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवताडे, हेमंत खडसरे आणि विलास वसावे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे सलमान याला १९ डिसेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.

Web Title: The thief was arrested in Khopat area of Thane