माॅर्निंगवॉक करणाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्याचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST2021-07-27T04:42:25+5:302021-07-27T04:42:25+5:30
ठाणे: मार्निंगवॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या तेजसिंग गैराल (वय ५९, रा. वर्तकनगर, ठाणे) यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी खेचून मोटारसायकलीवरून ...

माॅर्निंगवॉक करणाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्याचे पलायन
ठाणे: मार्निंगवॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या तेजसिंग गैराल (वय ५९, रा. वर्तकनगर, ठाणे) यांच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी खेचून मोटारसायकलीवरून दोघांनी पलायन केल्याची घटना रविवारी पहाटेच्यासुमारास घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तेजसिंग हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी २५ जुलैरोजी पहाटे ५ वाजण्याच्यासुमारास घराबाहेर पडले. ते पोखरोण रोड क्रमांक एक येथून उपवन ते कॅडबरी कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावरुन पायी समतानगर येथील आपल्या घराकडे जात होते. ते पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर येथील रेप्टाकोर्स कंपनी गेटजवळ आले होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून अचानक मोटारसायकलीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या मानेवर हात टाकून त्यांची २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून पलायन केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शेट्टी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.