शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत सर्वेक्षणाचा थांगपत्ताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:49 IST

धारावीत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अनिकेत घमंडी।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर दहा दिवसांनतरही ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेचा कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत प्रारंभ झालेला नाही. या योजनेत सहभागी होण्यास आशा वर्कर, शिक्षक यांनी ठाम विरोध दर्शवल्याने स्वयंसेवक मिळत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

धारावीत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे नगरसेवकांनी या सर्वेक्षणाकरिता सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले होते. काही नगरसेवकांनी प्रभागात सर्व्हे करून अँटीजेन टेस्ट शिबिरांचे आयोजन केले होते. सर्वेक्षणाकरिता पुन्हा स्वयंसेवक कसे द्यायचे, असा नगरसेवकांचा प्रश्न आहे.

दोन महिन्यांपूर्वी आ. रवींद्र चव्हाण आणि रा.स्व.संघ, जनकल्याण समितीने कोरोना नियंत्रणाकरिता ७५ स्वयंसेवकांना ‘कोरोना योद्धा’ केले होते. त्यापैकी ६ जणांना लागण झाली. त्यावेळी डोंबिवली पूर्व पश्चिम, कल्याण पूर्वेतील हजारो नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. ज्यांच्यात लक्षणे दिसली त्यांच्यावर उपचार करण्यात आले.भाजपची ही मोहीम पाहून अन्य पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सर्वेक्षण योजना राबवली होती. आता पुन्हा कोणीही स्वत:हून सर्वेक्षणाकरिता पुढे येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.त्या योजनेसंदर्भात मोबाइलवर जेवढी माहिती आली तेवढीच. पण त्यानंतर प्रत्यक्ष कोणीही सर्व्हेसाठी आलेले नाही.- नंदू म्हात्रे, नगरसेवक, काँग्रेससुरुवातीला रुग्ण मिळाल्यावर म्हात्रेनगरमध्ये काही इमारतींची तातडीने तपासणी केली, पण आता कसलाही सर्व्हे सुरु नाही.- मुकुंद पेडणेकर, नगरसेवकस्वयंसेवक, शिक्षक अशी पथके तयार करण्यात येत आहेत. मनपासह खासगी शाळांच्या शिक्षकांनी सहभागी व्हावे, याकरिता पत्रव्यवहार झाला आहे. जेथे नगरसेवकांनी स्वयंसेवक उपलब्ध करुन दिले आहेत, त्याठिकाणी काम सुरु झाले आहे.- डॉ. प्रतिभा पानपाटील, आरोग्य अधिकारी, मनपाबहुतांश नगरसेवकांनी आधीच त्यांच्या प्रभागात सर्व्हे केला होता. आता मनपाकडून सर्व्हे करण्याचे नियोजन सुरु असून टप्प्याटप्प्याने सर्व्हे करण्यात येईल. सामाजिक संस्थांसमवेत अधिकाऱ्यांचे बोलणे सुरु आहे. - विनीता राणे, महापौरमाझ्या प्रभागात मनपाकडून अद्याप सर्व्हे सुरु झालेला नाही. मी मात्र दोन ठिकाणी अ‍ॅण्टीजेन टेस्ट विनामूल्य करण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा लाभ नागरिक घेत आहेत.- राहुल दामले, विरोधी पक्षनेतेमाझ्या प्रभागात मी आधीच आरोग्यविषयक सर्व्हे राबवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेतच्या आॅनलाइन सेमिनारमध्ये मी सहभागी झालो होतो. माझ्या माहितीनुसार प्रभागात मनपाकडून सर्व्हे सुरु झालेला नाही.- मंदार हळबे, नगरसेवक, मनसेमाझ्या प्रभागात अजून मनपाकडून कोणतेही आरोग्य पथक सर्वेक्षणाकरिता आलेले नाही. जेव्हा मनपाचे पथक येईल तेव्हा त्यांना हवे ते सहकार्य करण्यात येईल.- विकास म्हात्रे, स्थायी समिती सभापतीआमच्या दोन्ही प्रभागात आम्ही शनिवारी सर्व्हे सुरु करीत आहोत. स्वयंसेवकांकडून सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरभर प्रत्येक प्रभागात तो उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे.- राजेश मोरे, नगरसेवक, शिवसेना शहरप्रमुख, डोंबिवलीमाझ्या प्रभागात सर्व्हे केला होता, आता तो पुन्हा करण्याचे नियोजन नाही. पण मनपाने सर्व्हे केला तर सहकार्य करण्यात येईल. पण पुन्हा स्वयंसेवक मिळणे कठीण आहे.- खुशबू चौधरी, नगरसेविका, भाजप

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस